गुरूमाँ - आई
🌎 Gurumaa Ke Sandesh 🌏
गुरूमाँ - आई
आई,
तव पावन चरण स्पर्शता आज या दिनी।
कृतार्थ जाहली आमुची ही महाराष्ट्र भूमी।।
आई,
शक्तीस्वरूपा तू, प्रेमळ, हसरी वात्सल्य मूर्ती तू।
शिक्षिका, लेखिका, कवयित्री तू, मूर्तीमंत त्यागाची प्रतिमा तू॥
आई,
आपल्या समर्पण ध्यान कुटुंबाची पालनकर्ती तू।
साधावा कसा प्रपंचातुनी परमार्थ याची यशोगाथा तू।।
आई,
नंदनवन फुलले आमच्या जीवनी, आचरिता तुझी संस्कृती।
अन प्रेरक प्रसंगानी तुझिया लाभली समर्पणाची शक्ती।।
आई,
सूर्याचे तेज अन चंद्राच्या शितलतेसम तुझा सहवास हा लाभला।
अन कामगारांचा महाराष्ट्र दिन आज साधकांचा महादिन ठरला।।
आई,
समर्पणचे बीज अंकुरले अन तव प्रेमाने वटवृक्ष हा बहरला।
अन तुझी श्रध्दा, तुझा त्याग, स्वामीजींचे प्रेरणास्थान ठरला ।।
तव कारणे प्रकाशिले विश्वाचे आर्त आम्हां साधकां ठायी।
आई होऊ कशी उतराई, आई, होऊ कशी उतराई, होऊ कशी उतराई।।
॥जय बाबा स्वामी॥
(मुंबई मे 1/5/19 को हुवे प्रोग्राम मे ये कृति गुरुमा के लिए.. l)
Comments
Post a Comment